3 min read

अधिक कदम : borderless World Foundation

Exploring the mission and impact of Borderless World Foundation in creating global connections.

Social ImpactCommunityGlobal

खूप सोपं आहे इथे बसून कश्मीर वर बोलणं. तिथली परिस्तिथी ऐकून तिथल्या लोकांबद्दल द्वेष करणं. तिथे काय करायला हवं, काय नको हे सांगणं. भारतीय सैन्य, मुस्लिम, कश्मीर पंडीत यांवर चर्चा रंगतात इकडे.

अधीक कदम नावाचा एक व्यक्ती तिथल्या लोकांसाठी काम करायचं ठरवतो. पुणे ते कश्मीर हा प्रवास. Borderless world foundation नावाने अधिक दादाने सुरु केलेली ही संस्था. कश्मीर मधल्या अनाथ मुलींना सांभाळणे, त्यांचं शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, लग्न हे सर्व कामे करतो. तसेच काही विकासाची कामं हाती घेतली आहेत सामाजिक-सांस्कृतिक, स्थानिक सामाजिक संरचना. सशस्त्र संघर्षाच्या बळी गेलेल्या स्त्रिया व त्यांच्या पुनर्वसनासाठीचे कार्य. आणि बरेच.


ही सगळी कामं तो कुठलीही सरकारी मदत न घेता करतो. उलट त्यांनी जर मदत घेतली तर तिथल्या कट्टरपंथी दहशतवाद्यांचा धोका आहेच. तिथल्या स्थानिक मौलवींचा विरोध, दहशतवाद्यांचा विरोध, काही प्रमाणात तिथल्या सरकारचा विरोध. एवढं होऊन देखील त्याच्या घरावर साधा एक दगड सुद्धा कोणी मारला नाही. प्रेम हे यावरील उत्तर आहे. अधीक ने कुणाचा द्वेष केला नाही. त्याने तिथे सर्वांवर निखळ प्रेम केलं आणि त्याला तिथे ते परत भेटत आहे. कश्मीर समजून घ्यायचा असेल तर निखिल वागळे यांनी घेतलेली अधिक दादाची एक जुनी मुलाखत आहे. ती पहा.

Video content placeholder

संस्थेचं नाव खूप आकर्षक आहे. Borderless World. सीमा नसलेलं जग विचार करूनच प्रेरणा भेटते. कसलेही सीमावाद नाही, भांडणं नाहीत, सतत युध्दाबाबतची काळजी नाही, सुरक्षांवरील अफाट खर्च नाही. धार्मिक, भाषिक, प्रांत कसलेच भेद माहीत. सगळे शांत सुखी.

मला वाटतं की कश्मीर प्रश्न फक्त चर्चा करून सुटणं अवघडच. ठोस निर्णय हे त्याला पर्याय नाहीत. तेथील लोकांना आपल्यात सामावून घेणं, त्यांना भारताबद्दल आपलेपणा वाटावा यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती तिथे जाऊ शकत नाही ही वस्तुस्तिथी असली तरी पण आहोत त्या ठिकाणी, जमेल त्या वेळेत, आपण मदत करू शकतो. मदत फक्त पैशांची नसते हे परत परत सांगायला नको. मी त्याच्याशी बोलत असताना त्याला मदत करण्याची इच्छा दर्शवली. त्याने क्षणात उत्तर दिलं

http://borderlessworldfoundation.org हे संकेतस्थळ मित्रांपर्यंत पोहोचवणे ही देखील मदतच आहे. त्याच्या संकेतस्थळावर वर एक ओळ आहे ‘VOLUNTEERS DO NOT NECESSARILY HAVE THE TIME; THEY JUST HAVE THE HEART’

– अनिकेत पाटील

Additional content image